पुणे – देशात बऱ्याच जणांकडे अनधिकृत ड्रोन आहेत. त्याचा वापर शूटिंग इतर कारणासाठी केला जातो. ज्यांच्याकडे बेकायदेशीर ड्रोन आहेत त्यांनी नोंदणी दि. 31 जानेवारी पूर्वी करण्याचे आवाहन नागरी विमान वाहतूक महासंचलनालयाने केले आहे.
अन्यथा अनधिकृत ड्रोन बाळगणाऱ्यावर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अशा ड्रोनची नोंदणी होणे आवश्यक आहे. नागरीकाकडील बेकायदेशीर ड्रोनची माहिती आम्हाला मिळालेली आहे. देशभरामध्ये 50 ते 60 हजार अनधिकृत ड्रोन आहेत.
अनाधिकृत ड्रोन बाळगणाऱ्यांना या ड्रोनची नोंदणी ऑनलाइन करावी. याबाबत बोलताना फिकी या संघटनेच्या ड्रोन समितीचे सदस्य अंकित मेहता यांनी सांगितले की, देश विदेशामध्ये ड्रोनचा वापर करून काही हिंसाचाराच्या घटना घडल्यामुळे सरकार या ड्रोनची नोंदणी करण्याबाबत आग्रही आहे. त्यांची नोंदणी केल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या दिशानिर्देशक सूचनाच्या अधीन राहूनच अशा ड्रोनचा वापर करता येतो.
केवळ नोंदणी केल्यामुळेच ड्रोन वापरता येते असे नाही. ड्रोन कधी वापरले जाणार आहे, कशासाठी वापरले जाणार आहे याची माहिती महासंचालनालयाच्या सॉफ्टवेअरवर अपलोड करण्याची आवश्यकता असते.