नवी दिल्ली : सर्व वस्तूंसाठीच्या घाऊक किंमत निर्देशांकात डिसेंबर 2019 मध्ये आधीच्या महिन्याच्या तुलनेत 0.4 टक्के वाढ होऊन तो 122.3 वरून 122.8 (तात्पुरती आकडेवारी)वर पोहोचला.
घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा वार्षिक दर डिसेंबर 2019 मध्ये 2.59 टक्के राहिला. आधीच्या महिन्यात तो 0.58 टक्के(तात्पुरती आकडेवारी) आणि डिसेंबर 2018 मध्ये तो 3.46 टक्के होता.
खाद्येतर घटकांच्या दरांचा निर्देशांक 5.5 टक्के वाढून ते 127 वरून 134 झाला. खनिजांचे दरांमध्ये 0.8 टक्के घट होऊन निर्देशांक 154.8 वरून 153.6 झाला.
कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅसच्या निर्देशांकात 3.5 टक्के वाढ हाऊन तो आधीच्या महिन्याच्या 83.1 वरून 86 झाला. इंधन आणि वीज या गटाच्या निर्देशांकात कोणताही बदल न होता तो 101.3 राहिला. उत्पादित वस्तू या गटाच्या निर्देशांकात 0.2 टक्के वाढ होऊन ते 117.8 वरुन 118 झाला.
अन्नधान्य आधारित घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर वाढून डिसेंबर 2019 मध्ये तो 11.05 टक्के झाला. नोव्हेंबर 2019 मध्ये तो 9.02 टक्के होता.
डिसेंबरमधील घाऊक किंमतींचे दर (वाढीचे प्रमाण टक्क्यांमध्ये)
प्राथमिक वस्तू 148.8
अन्न घटक 162.5
विड्याची पाने 13 टक्के,
उडीद 9 टक्के
अंडी आणि मटण प्रत्येकी 5 टक्के
बाजरी आणि ज्वारी प्रत्येकी 3 टक्के
मूग, मसूर आणि मका प्रत्येकी 2 टक्के
घाऊक किंमतींचे दर (घट टक्क्यांमध्ये)
मटार/चवळी 11 टक्के
नाचणी, खारे मासे 3 टक्के
कॉफी, बीफ 2 टक्के
चहा, राजमा, गोडे मासे, फळे आणि भाज्या 1 टक्का