जामखेड : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त विविध क्षेत्रातील पत्रकार पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी दैनिक प्रभातचे तरुण तडफदार पत्रकार ओंकार दळवी यांना ‘राज्यस्तरीय पत्रकार सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आमदार सिमा हिरे महापौर सतिश कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकारिता क्षेत्रात लक्षवेधी कार्य करणाऱ्या पत्रकारांसह सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जामखेड येथील दैनिक प्रभात या वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी ओंकार दळवी यांनी केलेल्या निर्भिड बातम्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.
नाशिक येथील गरुडझेप अकेडमी, शेजारी रविवारी सायंकाळी ४ वाजता पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे. आमदार सिमा हिरे नाशिकचे महापौर सतिश कुलकर्णी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा निमंत्रक लक्ष्मण डोळस, तालुका अध्यक्ष जगदीश सोनवणे यांच्यासह पुरस्कार प्राप्त पत्रकार मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते.