लोणी काळभोर, (वार्ताहर) – श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या पौर्णिमा दिलीप शेवाळे यांना शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्या हस्ते लोकसेवा गुणवंत गुरुजन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणे जिल्हा, पुणे शहर व पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ आयोजित लोकसेवा गुणवंत गुरुजन सन्मान सोहळा फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात पार पडला.
यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूलचे प्राचार्य अमर शिरसागर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाचे प्रदेशाध्यक्ष केशवराव जाधव, प्रेरणादायी वक्ते, माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी, एम. बी. अष्टेकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देऊन आपले भविष्य सोनेरी करण्याची प्रेरणा देणार्या आणि देशासाठी गुणवंत विद्यार्थी घडविणार्या गुणवंत गुरुजनांना गौरवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
शिष्यवृत्ती परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्याचा वेध घेऊन देशाच्या प्रगतीसाठी झटणार्या आणि देशासाठी असे गुणवंत विद्यार्थी घडविणार्या गुणवंत गुरुजनांना प्रोत्साहन देणार्या शाळेला आणि शिक्षकांना गौरव चिन्ह व सन्मानपत्र देऊन यावेळी गौरविण्यात आले.