नगर – केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीनुसार सन 2019-20 या वर्षासाठी जिल्ह्यात नाफेड करीता मार्केटींग फेडरेशनच्या सभासद संस्थामार्फत तूर खरेदी नोंदणी केंद्र सुरु करण्यात आलेले आहे.
शासनाने तूर खरेदीसाठी 5 हजार 800 रुपये प्रति क्विंटल दर व दिनांक 1 जानेवारी 2020 ते 14 फेब्रुवारी 2020 पर्यत नाव नोंदणीचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी सातबारा उतारा, चालू बॅंक खाते पासबुक प्रत, आधारकार्ड या दस्तऐवजाची आवश्यकता असून नोंदणीत भरण्यात येणारी सर्व माहिती बरोबर असल्यास नोंदणीकृत मोबाइलवर एसएमएस येईल.
शेतकऱ्यांनी शेतमाल हा स्वच्छ व वाळवून खरेदी केंद्रावर घेऊन यावा. माल खरेदी झाल्यानंतर त्वरीत ऑनलाईन काटा पट्टी घेण्यात यावी. या योजनेमध्ये केवळ ऑनलाइन काटा पट्टी ग्राहय धरण्यात येईल. शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बॅंक खाती ऑनलाईन पध्दतीने जमा होणार आहे.
त्यामुळे बॅक खात्याची माहिती बिनचूक देण्यात यावी. अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बॅंक खात्यामध्ये रक्कम वर्ग होऊ शकते. जिल्ह्यातील सर्व शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे जिल्हा पणन अधिकारी नगर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव नाफेड केंद्रावर हमाल प्रतिक्विंटल 40 रुपये दराने हमाली घेतात मापारी पाच रुपये क्विंटल प्रमाणे शेतकऱ्या कडून पैसे घेतात याकडे कोणाचेच लक्ष नाही