सिडनी : मार्नस लबुशेनच्या शानदार शतकी आणि स्टीव स्मिथच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरूध्दच्या मालिकेतील तिस-या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ९० षटकांत ३ बाद २८३ धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे.
An unbeaten 130 from Marnus Labuschagne and useful contributions from David Warner and Steve Smith help Australia finish day one of the Sydney Test on 283/3.#AUSvNZ SCORECARD: https://t.co/Of7f25oYkN pic.twitter.com/I4p4MEc0UH
— ICC (@ICC) January 3, 2020
तत्पूर्वी, आॅस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, आॅस्ट्रेलियाची सुरूवात चांगली झाली नाही. जो बर्न्स १८ धावांवर असताना काॅलिन डी ग्रैंडहेमने राॅस टेलरकरवी त्याला झेलबाद करत आॅस्ट्रेलियास पहिला धक्का दिला. बर्न्स आणि वाॅर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी ३९ धावा जोडल्या. त्यानंतर संघाची धावसंख्या ९५ असताना डेविड वाॅर्नर ४५ धावांवर बाद झाला. त्याला नील वॅगनरने ग्रैंडहोमकरवी झेलबाद केले.
त्यानंतर मार्नस लबुशेन आणि स्टीव स्मिथने संघाचा डाव सावरत तिस-या विकेटसाठी १५६ धावा जोडल्या. स्टीव स्मिथला ६३ धावांवर डी ग्रैंडहोमने राॅस टेलरकरवी झेलबाद करत आॅस्ट्रेलियाची २५१ धावांवर तिसरी विकेट काढली. त्यापूर्वी मार्नस लबूशेनने कसोटी कारकिर्दीतील ४ थे शतक साजरे केले.
त्यानंतर लबूशेन आणि मैथ्यू वेड यांनी डाव सावरत आणखी पडझड होऊ न देता संघाची धावसंख्या २८३ पर्यंत नेली. न्यूझीलंडकडून ग्रैंडहोमने २ तर नील वॅगनरने १ गडी बाद केला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा लबुशेन नाबाद १३० तर मैथ्यू वेड २२ धावांवर खेळत होता.