बेंगलुरू : बेंगलुरू एफसीने जमैकाचा आंतरराष्ट्रीय फुटबाॅलपटू डेशाॅर्न ब्राऊन याच्याशी आयएसएल २०२०-२१ या सत्रासाठी करार केला आहे. यामुळे बेंगलुरू एफसीचे आक्रमण अधिक मजबूत होणार आहे. बेंगलुरूचा संघ यदांच्या आयएसएल मध्ये दहा सामन्यानंतर तिस-या स्थानी आहे.
"It’s a difficult task, coming in mid-way through the season, but one that I am prepared for." More on what @strika09
said after joining the Blues. #BrownIsBlue #WeAreBFC https://t.co/gPrNP8TMhD— Bengaluru FC (@bengalurufc) January 1, 2020
बेंगलूर संघाचे मुख्य प्रशिक्षक कार्लेस कुआड्राट म्हणाले की, ” आमच्याकडे सातव्या विदेशी खेळाडूशी करार करण्याचा पर्याय उपलब्ध होता. याचा योग्य वापर करण्याची ही योग्य वेळ होती.
डेशाॅनच्या समावेशामुळे आघाडीच्या फळाक आक्रमणासाठी अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. डेशाॅन हा भले ही सत्राच्या मध्येच आमच्या संघात सामील होत असला तरी आम्हाला विश्वास आहे की, तो संघास लक्ष्यापर्यंत पोहचविण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडेल.”