लंडन : इंग्लंडचा फुटबाॅल क्लब ब्राइटन संघाने इंग्लिश प्रिमियर लीगमधील सामन्यात चेल्सी विरूध्दाचा सामना १-१ ने बरोबरीत रोखला. ब्राइटनच्या घरच्या मैदानावर म्हणजेच फाल्मेर स्टेडियम वर हा सामना झाला.
A brilliant late equaliser from Alireza Jahanbakhsh thwarts Chelsea as 2020 begins in dramatic fashion in the #PL#BHACHE pic.twitter.com/KrR8jvoqkq
— Premier League (@premierleague) January 1, 2020
चेल्सीकडून पहिल्या सत्रात १० व्या मिनिटाला सीजार एजप्लिकुएटाने गोल केला. चेल्सीचा संघ ८३ व्या मिनिटांपर्यत १-० ने आघाडीवर होता, पण ब्राइटनच्या एलिरेजा जेहानबख्शने बायसिकल किकव्दारे गोल करत ८४ व्या मिनिटाला संघास बरोबरी साधून दिली.
The points are shared on the south coast… #BHACHE pic.twitter.com/apuJhNwAU5
— Chelsea FC (@ChelseaFC) January 1, 2020
चेल्सीचा संघ २१ सामन्यातील ३६ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे तर ब्राइटनचा संघ २१ सामन्यातील २४ गुणांसह गुणतालिकेत १३ व्या स्थानी आहे.