पुणे – दौंड स्टेशनच्या अलिकडे मनमाड रेल्वे मार्गिकेला जोडणारी “कॉर्ड लाइन’ मागील महिन्यात पूर्ण झाली. यामुळे दौंड स्थानकात होणारी रेल्वेंची “कोंडी’ कमी होणार आहे. या मार्गावरून गाड्या धावण्यास सुरूवात झाली असून, यामुळे प्रवासातील वेळ 30 मिनिटांनी वाचणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
मध्य रेल्वेने आपला वार्षिक अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. या अहवालामध्ये प्रशासनाने सन 2019 मधील कामांबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये सुरक्षा विषयक मोहिमा, जागरूकता अभियान, उपनगरी आणि एक्स्प्रेस सेवा, तिकीट सुविधा, प्रवासी सुविधा आदींबाबत माहिती नमूद केली आहे. येत्या वर्षात आणखी महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
पुणे विभागातील उल्लेखनीय कामे
रेल्वे सुरक्षा दलाचे “ऑपरेशन थंडर’
तीनपेक्षा अधिक स्थानकांत पादचारी पूल
पुणे-अजनी आणि पुणे-नागपूर साप्ताहिक हमसफर एक्स्प्रेसचे संचलन
पुणे-कर्जत पॅसेंजर पनवेलपर्यंत विस्तारित
लोणंद-फलटणदरम्यान विशेष डेमू सुरू