नवी दिल्ली – दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना त्याच्या 95 व्या जयंती निमीत्त आज देशभर आदरांजली वाहण्यात आली. दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या स्मारकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी, संरक्षण मंत्री राजनाथिंसंह, अमित शहा आणि वाजपेयी यांच्या कुटुंबियांपैकी अनेक जण उपस्थित होते. मोदींनी अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाच्या प्रति दिलेल्या योगदानाचे स्मरण करीत त्यांचा एक व्हिडीओही ट्विटरवर शेअर केला.
मोदींनी पंडित मदनमोहन मालवीय यांनाही त्यांच्या 158 व्या जयंती निमीत्त आदरांजली वाहिली.मालवीय यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत तसेच शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचाही आपल्या संदेशात उल्लेख केला आहे.