मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर कमालीच्या सक्रीय झाल्या आहेत. भाजपची सत्ता गेल्यानंतर त्यांची ट्विटरवरील सक्रियता अधिकच वाढली आहे. आता थेट मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर शिवसेनेनेही अमृता फडणवीस यांना चांगलेच सुनावले आहे.
युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई म्हणाले कि, गेल्या ५ वर्षात आपण महाराष्ट्राला आपल्यावर टीका करायच्या अनेक संधी दिल्या. पण शिवसेनेने कधीही वैयक्तिक टीका केली नाही. कारण आपण राजकारणात नव्हतात. आता जर तुम्हाला कंठ फुटला असेल तर मग टीका सोसवायची तयारी ठेवा. देवेंद्र फडणवीस यांचे पण हेच मत असल्याचे समजते, असा टोला अमृता वहिनींना लागलेला आहे.
गेल्या ५ वर्षात आपण महाराष्ट्राला आपल्यावर टीका करायच्या अनेक संध्या दिल्या पण शिवसेनेने कधी ही वैयक्तिक टीका केली नाही कारण आपण राजकारणात नव्हतात. आता जर तुम्हाला कंठ फुटला असेल तर मग टीका सोसवायची तयारी ठेवा. @Dev_Fadnavis जी ह्यांचे पण हेच मत असल्याचे समजते. https://t.co/4VuVchAyPH
— Varun Sardesai (@SardesaiVarun) December 24, 2019
दरम्यान, उद्धव ठाकरे, लोकांना मारून तुम्ही नेतृत्व करू शकत नाही. तो हल्ला आहे, नेतृत्व नाही. दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे, अशी टीका अमृता फडणवीस यांनी शिवसेनेच्या ‘जोडे मारो’ आंदोलनावर केली होती.
You don’t lead people by hitting people over the head, that’s assault – not leadership @OfficeofUT !
दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका,
हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे ! pic.twitter.com/IfMG0rFnrZ— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 24, 2019