नवी दिल्ली – ग्राहक विवाद निवारण आयोगाने डॉमिनोज कंपनीला तब्ब्ल दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांकडून पिशवीसाठी अतिरिक्त पैसे आकारल्याप्रकरणी हा दंड वसूल करण्यात आला आहे. चंदीगड येथील ग्राहक आयोगाने हा निर्णय दिला. डॉमिनोजची मालकी असणाऱ्या ज्युबिलियंट फूड वर्क्स लिमिटेडला हा दंड ठोठावण्यात आला आहे.
दरम्यान, 13 नोव्हेंबर 2019 रोजी पेशाने वकील असणाऱ्या ‘पंकज चंगोठी’या यांच्याकडून डॉमिनोजच्या आऊटलेटमध्ये पिशवीसाठी अतिरिक्त 14 रुपयांची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांनी ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना ग्राहक आयोगाने कंपनीला दहा लाखांचा दंड ठोठावला आहे.