बारामती: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघांमध्ये सहाशे बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आहे तशाच पद्धतीने टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून बारामतीत देखील अध्यावत कॅन्सर हॉस्पिटल करण्याचा मानस टाटा ट्रस्ट यांनी दाखवल्यामुळे बारामतीत देखील आता कॅन्सर हॉस्पिटल होणार असल्याचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितलेय.. त्या बारामतीतील ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट येथे सायन्स अंड इंनोवेशन ऍक्टिव्हिटी सेंटरच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होत्या.