फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर या सेलिब्रिटी जोडीने नुकतीच कायरोथेरपी नावाची एक हिलींग थेरपी करून घेतली आहे. या थेरपीच्यावेळचे फोटोही फरहान अख्तरने सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. “कायरोथेरपी’ ही अशी थेरपी आहे ज्यासाठी अतिशय थंड तापमानामध्ये काही काळ रहावे लागते.
शरीराचे तापमान खूप कमी झाल्यावर काही ग्रंथी संकुचित पावतात आणि मग त्यावर उपचार केला जातो. बऱ्याचवेळेस त्वचेवरील उपचारांसाठी ही थेरपी वापरली जाते. शिबानी दांडेकरला वजा 130 तापमानाच्या टबमध्ये 3 मिनिटे रहायला लागले. होते. याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या 3 मिनिटांनंतर आपल्याला आलेला अनुभव अवर्णनीय होता, असे तिने म्हटले आहे.
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरने ही थेरपी कोणत्या कारणासाठी केली, हे मात्र समजू शकलेले नाही. फरहान अख्तर सध्या “तुफान’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यात तो एका बॉक्सरचा रोल करतो आहे. “भाग मिल्खा भाग’नंतरचा हा त्याचा आणखी क्रीडापट असणार आहे. त्याच्या बॉक्सिंगच्या ट्रेनिंगचा भाग म्हणूनही कदाचित त्याला ही थेरपी करायला लागली असू शकते.