ऍलेड: ऑस्ट्रेलियाने नॅथन लायनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानचा एक डाव आणि 48 धावांनी पराभव केला. यजमान ऑस्ट्रेलिायाने ही मालिका 2-0 अशी जिंकली, तर पाकिस्तानला ऑस्ट्रेलियात सलग 14 कसोटीत पराभव स्वीकारावा लागला. या मालिकेत त्रिशतकासह सातत्यपूर्ण धावा करणारा डेव्हिड वॉर्नर सामन्याचा तसेच मालिकेचा मानकरी ठरला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 589 धावा केल्यानंतर पाकिस्तानचा पहिला डाव 302 धावांत संपविताना त्यांना फॉलोऑन दिला होता. पाकिस्तानचा दुसरा डाव देखील नॅथन लायनच्या गोलंदाजीसमोर गडगडला व त्यांना एक डाव आणि 48 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने यंदाच्या वर्षात कसोटी क्रिकेटमधे 50 वा बळी घेत विक्रमी कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा कमिन्स या वर्षातील पहिलाच गोलंदाज ठरला आहे.