हैद्राबाद – एका महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार करून तिला पेटवण्यात आल्याने देशभर संतापाची लाट पसरली आहे. दोन दिवसातच पुन्हा एकदा त्याच परिसरात आणखी एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थतेत सापडल्याने हैद्राबाद पुन्हा हादरले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शमशाबाद परिसरातील बाहेरच्या सिड्डुलागट्टा रोडनजीक एका महिलेचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह शुक्रवारी सापडला आहे. या महिलेचे वय ३५ वर्ष असण्याची शक्यता वर्तवली आहे. प्राथमिक तपासणीनंतर मृदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी याविरोधात अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
Telangana: Burnt body of a woman found in Shamshabad, today. VC Sajjanar, CP, Cyberabad says, “Body was found in an open area on the outskirts of Shamshabad. It is being moved to a government hospital for autopsy, case being registered”. pic.twitter.com/8rPneYpDsm
— ANI (@ANI) November 29, 2019