शिरूर – पुण्याच्या ग्रामीण भागात वाहन विक्री आणि उद्योगाला चालना मिळण्याच्या हेतूने, “पुण्याची ओळख’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दै. प्रभातच्या वतीने “ऑटो झोन-2019′ या कार्सच्या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यातील टॉप मॉडेल 20.65 लाख रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रदर्शनात जीप कंपासला ग्राहकांची मोठी पसंत मिळत आहे. या वाहनामध्ये 50 हुन अधिक सेफ्टी आणि सिक्युरिटी फीचर्स देण्यात आले आहेत. या फीचर्समध्ये एबीएस, हिल स्टार्ट अॅसिस्ट, अॅडेप्टिव्ह ब्रेक लाईट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि पॅनिक ब्रेक असिस्ट यांसारखे अत्याधुनिक प्रणालीचा समावेश आहे. शिवाय या एसयूव्हीमध्ये सहा एअरबॅग देण्यात आल्या आहेत.