मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर मात्र सन्नाटा असल्याचे दिसून आल आहे. जवळपास सर्वच कार्यकर्ते संभ्रमात दिसून आले.
फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचे कळताच राज्यभरातील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरवात केली आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील चाणक्य असल्याच्या पोस्ट फिरवायला सुरुवात केली. तसेच अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून अजित दादा तुम आज बढो हं तुम्हारे साथ हे अशा घोषणाही देण्यात आल्या आहेत. कालपर्यंत शांत असलेले कार्यकर्ते आज जोमात असल्याचे पाहायला मिळाले.