पुन्हा अतिक्रमणे
सलगपणे मनपाकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. शहातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यानंतर सावेडी उपनगर व आज जिल्हा रुग्णालय परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.शहरातील माळीवाडा, गंजबाजार, घासगल्ली, चितळेरोड याठिकाणची अतिक्रमणे तीन दिवसांपूर्वी काढली होती. या भागात पुन्हा अतिक्रमणे थाटली आहेत.
नगर – मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने आज सकाळी जिल्हा रूग्णालय रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली. रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेली दुकाने तसेच टपऱ्या या कारवाईत काढण्यात आल्या. मनपा अतिक्रमण विरोधी पथकप्रमुख सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
मनपा प्रशासनाने मंगळवारी प्रोपेसर कॉलनी, भिस्तबाग चौक, पाइपलाइन रस्त्यावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविली होती. त्यानंतर आज जिल्हा रुग्णालय ते तारकपूर रस्त्यावरील अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्यात आली. माळीवाडा रस्ता, कापडबाजार, बंगाल चौकी ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता, कोठला परिसर, चितळेरोड, त्यानंतर सावेडी उपनगरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.