इस्लामाबाद : जयपूरहून मस्कतला जाणाऱ्या विमानाला पाकिस्तानच्या नागरी विमान प्राधिकरणाने जीवदान दिले. या विमानच्या पायलटने खराब हवामानामुळे मदतीसाठी याचना केली होती.
सिंध परगण्यातील चोर क्षेत्राच्या हवाई हद्दीतून जात असताना अचानक विमानला खराब हवामानाला सामोरे जावे लागले. त्यावेळी अचानक विजा चमकू लागल्याने ते विमान 34 हजार फूट खाली आणण्यात आले. त्यावेळी अनपेक्षितपणे विमान चालकाने मदतीची मागणी केली. त्यावेळी पाकिस्तानच्या हवाई नियंत्रकांनी त्यांना पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून उर्वरीत प्रवास करू देण्यास मान्यता दिली. यावेळी विमानात सुमारे 150 प्रवाशी होते.
बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारतीय विमानांना पाकिस्तानी हवाई हद्द वापरण्यास मज्जाव केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानालाही त्यांच्या हद्दीतून प्रवास करू देण्यास मनाई केली होती.