हैदराबादमधील बेपत्ता अभियंता पाकिस्तानात!

हैदराबाद : हैदराबादमधील एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि मध्यप्रदेशातील एका तरूणाला पाकिस्तानात अटक केली. तो बेकायदा देशात घुसल्याचे पाकिस्तानी पोलिसांचे म्हणणे आहे. हा अभियंता दोन वर्षापासून बेपत्ता होता.

मायदम प्रशांत आणि दारीलाल या दोघांना पाकिस्तान पोलिसांनी बहवालपूरर प्रातातील चोलीश्‍तान येथे अटक केली. राजस्थान मार्गे त्यांनी कोणतीही योग्य कागदपत्रे नसताना देशात प्रवेश केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रशांतचे वडील एम. बाबूराव हे विशाखापट्टणम येथे खासगी नोकरी करतात. ते रहायला हैदराबाद येथे आहेत. त्यांच्या मुलगा 2017 पासून बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या मुलाने 2010 मध्ये विशाखापट्टणम्‌ येथील महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. त्यानंतर त्याला बंगळुरात नोकरी मिळाली. प्रशांतचे बंगळूरात नोकरी करत असताना एका महिला सहकाऱ्यासोबत प्रेम जुळले. मात्र ती नंतर स्विर्त्झलंडला गेली. प्रशांत हैदराबादला परत आला. 29 एप्रिल 2017 ला तो नेहमीसारखा कामावर गेला मात्र परत आला नाही.

त्यांनी आपण पाकिस्तानात आहोत, लवकरच आपली सुटका होईल,असा संदेश देणारा व्हिडिओ त्याने पाठवल्यावर कुटुंबियांना तो पाकिस्तानात असल्याचे समजले. मात्र तो पाकिस्ताना कसा आणि का गेला याचा उलगडा होऊ शकला नाही. त्याच्या दिल्लीतील नातेवाईकांनी परराष्ट्र मंत्रालयात भेटून सुटकेसाठी मदत करण्याची विनंती केली.

दरम्यान सोशल मिडियावर ही गोष्ट वेगाने पसरत असून त्यात तथ्य नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आम्ही बेपत्ता होण्याची फिर्याद नोंदवून घेतली असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)