बऱ्याच दिवसांनी स्वरा भास्करबाबत एक वाद निर्माण झाला आहे. चार वर्षांच्या एका लहान मुलाने स्वराला “आंटी’ म्हटले. त्यामुळे स्वरा चांगलीच भडकली. आपल्याला “आंटी’ म्हणणे हा तिला अपमान वाटला. मात्र तिच्या या प्रतिक्रियेवरून फॅन्सनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे.
“सन ऑफ एबिश’ या चॅट शो मध्ये स्वरा भास्कर आली होती. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये स्वरा एका बालकलाकाराला उद्देशून अगदी असंवेदनशीलपणे बोलताना दिसते आहे. सिनेमाच्या सेटवरच या लहानग्याने स्वराला “आंटी’ म्हटल्याने तिला राग आला होता.
एवढेच नव्हे तर या लहान मुलाने “आंटी’ म्हणण्याने आपण अगदी निराश झाल्याचेही तिने या कार्यक्रमादरम्यान सांगितले होते. वास्तविक ही घटना घडली तेंव्हा आपण त्या मुलाला काहीही म्हटले नाही. केवळ मनातल्या मनात राग व्यक्त केला होता. हा मुलगा खरोखरच दुष्ट होता, असेही स्वरा म्हणाली.
मात्र तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर फॅन्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. इतके की “हॅशटॅग- स्वराआंटी’ हा ट्रेन्डच सुरू झाला.