पिंपरी – पिंपरी, चिंचवड आणि भोसरी येथील विधानसभा निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी चांगलीच गर्दी केली आहे.
फेरीनिहाय निकाल जाहीर होत असताना कार्यकर्त्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. प्रत्येक फेरीअखेर कोण उमेदवार आघाडीवर, कोण उमेदवार पिछाडीवर याची माहिती कार्यकर्ते घेत आहेत. ध्वनीक्षेपकावर फेरीनिहाय माहिती दिली जात आहे.
कार्यकर्ते सोशल मिडीयावर देखील ‘अपडेट’ जाणुन घेत आहे. तसेच, कोण उमेदवार जिंकणार, कोण हरणार याचे अंदाज वर्तविले जात आहेत. बर्याच कार्यकर्त्यांनी निकाल ऐकण्यासाठी रस्त्यावरच ठाण मांडले आहे.