जामखेड : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हळुहळु हाती येत आहेत. त्यातच आता सर्व राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड मतदार संघाचे निकाल हाती येत आहे. सुरूवातीच्या कलानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस चे उमेदवार रोहित पवार हे आघाडीवर असल्याचे चित्र समोर आले आहे. दरम्यान, विजयाची अपेक्षा असलेल्या रोहित पवार यांचे मतमोजणी केंद्रावर आगमन झाले आहे.
कर्जत – जामखेडमधून राष्ट्रवादीचे रोहित पवार आघाडीवर, पहिल्या फेरीनंतर रोहित पवारांना ३ हजारांहून अधिक मतांची आघाडी असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांचे मतमोजणी केंद्रावर आगमन झाले असून विजयी होण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले.