कसबा मतदारसंघातून नागरिकांचा मिळतोय मोठा प्रतिसाद
पुणे – पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या कसबा मतदारसंघातून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीकडून अरविंद शिंदे रिंगणात असून त्यांनी जोरात प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, विविध स्तरांतील मतदारांच्या भेटी घेऊन ते पक्षाची भूमिका आणि विकासाचा मुद्दा मांडत आहेत.
अरविंद शिंदे यांनी निर्माण केलेल्या झंझावातामुळे मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कसबा मतदारसंघात अनेक मुद्दे असून मतदारसंघाचा विकास करणे, हाच ध्यास असल्याचे शिंदे प्रचारादरम्यान सांगत आहेत. गेल्या काही शिंदे यांनी कसबा मतदारसंघातील विविध पेठांमध्ये पदयात्रा काढून चांगलाच प्रभाव निर्माण केला आहे. येत्या निवडणुकीत मतदार आपल्याचाच निवडून देतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.