मुंबई – बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी त्यांच्या आगामी मोतीचूर चकनाचूर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चित्रपटात दोघांच्याही लग्नाची हटके गोष्ट पहायला मिळणार आहे. शुक्रवारीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता चित्रपच विश्लेषक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केल आहे.
Nawazuddin Siddiqui and Athiya Shetty… First look poster of #MotichoorChaknachoor… Directed by Debamitra Biswal… Viacom18 Studios presentation… 15 Nov 2019 release. pic.twitter.com/XQxwRO4Khp
— taran adarsh (@taran_adarsh) October 12, 2019
दरम्यान, या चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये नवाजुद्दीन आणि अथियाचा लग्नातील लूक पाहायला मिळतोय. विदेशात जाण्यासाठी आतुर असलेली अथिया आणि लग्नासाठी उताविळ झालेल्या नवाजुद्दीनची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. १५ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
धमाल उडवणारा असा आहे ट्रेलर –
अथिया शेट्टीच विदेशात जाण्याच स्वप्न असत, मात्र, यासाठी तिला एनआरआय मुलगाच हवा असतो त्यासाठी तिची धडपड सुरू असते. याच कारणासाठी ती नवाजुद्दीनसोबत लग्न करते. मात्र, लग्नानंतर तिला कळत, की त्याला लग्नानंतरच नोकरी लागली आहे. तिला ही गोष्ट समजल्यानतंर काय काय प्रसंग घडतात, त्याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय.
Myself Pushpinder… Le de ke ek maudi mil toh gayi, par ab kya hoga? ? #MotichoorChaknachoor trailer out now! https://t.co/fnfWHotnT0@theathiyashetty @MotichoorMovie @viacom18studios @woodpeckermv @AndhareAjit #RajeshBhatia #KiranBhatia @ZeeMusicCompany
— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) October 11, 2019