कार्यकर्ता मेळाव्यात केले कार्याचे कौतुक
कोंढवा – आमदार योगेश टिळेकर यांनी हडपसरच्या विकासासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पुणे शहरातून सर्वाधिक निधी हडपसरला आणला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने 50 वर्षांपासून प्रगतीपासून हडपसरला वंचित ठेवले होते, त्यांची घराणी मोठी झाली सर्वसामान्य माणूस मात्र गरीबच राहिला. परिसराचा कोणताही विकास झाला नाही.
परंतु, मागील 5 वर्षांत हडपसरमध्ये विकासाची गंगा आणून रखडलेला विकास आमदार टिळेकर यांनी सुरू केला, त्यांचे कौतुक केले पाहिजे. यापुढेही हडपसरच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजना व उपक्रमांसाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाहीत, त्यासाठी योगेश आण्णा टिळेकर यांच्यासारखा सक्षम उमेदवार निवडून दिला पाहिजे, असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी केले.
हडपसर विधानसभा मतदारसंघ भाजप, शिवसेना आरपीआय, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे उमेदवार आणि भाजप युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश(आण्णा)टिळेकर यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा मेळावा व माजी नगरसेविका विजया पोपटराव वाडकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपत जाहीर प्रवेश केला.
त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना बापट बोलत होते. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, आरपीआयच्या महिला आघाडी शहराध्यक्ष शशिकला वाघमारे, शिवसेना नगरसेविका संगीता ठोसर, संगिता आठवले, शिवसेना हडपसर प्रमुख तानाजी लोणकर, भाजप ओबीसी प्रदेशाध्यक्ष विकास रासकर, नगरसेवक मारुती तुपे, नाना भानगिरे, संजय घुले, उमेश गायकवाड, नगरसेविका प्राची आल्हाट, रंजना(नानी)टिळेकर, वृषाली कामठे, विरसेन जगताप, मनिषा कदम, राजेंद्र बाबर, आरपीआयचे खरात, गणेश कामठे, हिंदवी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष अभिजित बोराटे, सभापती भूषण तुपे, वंदना कोद्रे, जितेंद्र भंडारी, रवी तुपे, विराज तुपे, संदीप दळवी, इम्तियाज मोमीन, संजय सातव, आप्पासाहेब गायकवाड, शिवराज घुले, पुरुषोत्तम धारवाडकर उपस्थित होते.