डॉक्टरांच्या अनुभवामुळे आयव्हीएफ यशस्वी होण्याचे प्रमाण वाढलं

डॉ. यशवंत माने

कोल्हापूर/ प्रतिनिधी- संशोधनानुसार असे आढळले आहे की नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे तसेच डॉक्टरांच्या अनुभवामुळे आयव्हीएफ यशस्वी होण्याचे प्रमाण वाढले आहे. वंध्यत्वावर आधुनिक उपचार, रुग्णांची आपुलकीने सेवा करणे यामुळे अथर्व आयव्हीएफ रुग्णांसाठी आशेचा किरण ठरला आहे असे प्रतिपादन अथर्व आयव्हीएफ सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यशवंत माने यांनी केलंय.

डॉ. माने म्हणाले, बदलती जीवनशैली, कामाचा ताण-तणाव, अल्कोहोल, तंबाखूचे सेवन आणि लठ्ठपणा यामुळे देशभरातील वंध्यत्वामध्य दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला दिसून येते. त्याशिवाय पॉली-सिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, एंडोमेट्रियल क्षयरोग आणि लैंगिक संक्रमणामुळे देखील वंध्यत्वाला सामोरे जावे लागते.

पूर्वी वंध्यत्वावर फार कमी उपचार पद्धती अस्तित्वात होत्या त्यामुळे स्त्रियांमधील वंध्यत्व दूर होणे अतिशय कठीण बाब होती त्यामुळे अनेक स्त्रीयांना मातृत्वाच्या सुखापासून वंचित राहावे लागत असे. परंतु आता वंधत्व चिकित्सा व उपचार या क्षेत्रामध्ये खूपच क्रांतिकारकरित्या नवनवीन शोध लागले आहेत जेणेकरून अतिशय अवघड किंवा क्लिष्ठ कारणामुळे निर्माण झालेल्या वंधत्वावर मात करून अपत्यहीन जोडप्यांना आशेचा नवाकिरण दिसू लागला आहे.

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पल्लवी माने म्हणाल्या की, “विविध कारणांमुळे वंध्यत्वाच्या समस्येसाठी आयव्हीएफ हा एक उपाय आहे. भारतात, वंध्यत्व समस्यासाठी कायमस्वरुपी उपाय म्हणून आयव्हीएफकडे पहिले जाते. आयव्हीएफ मुळे रुग्ण हळूहळू जागरूक होऊन या प्रक्रियेची निवड करत आहे. जोडप्यांना नैराश्याचा सामना करावा लागतो त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यामुळेच वंध्यत्वासाराखी समस्या निर्माण होते. परंतु आयव्हीएफ उपचार हा अनेक जोडप्यांसाठी वरदान ठरलेला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.