नवी दिल्ली : काही दिवसांपुर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी एक देश एक भाषा अशी घोषणा दिली होती. त्यावेळी त्यांच्या या घोषणेचा सर्वच राज्यातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्यांच्या वक्तव्याचा अभिनेता कमल हसन यांनी विरोध केला होता. त्याच वक्तव्याचा आता पुन्हा एकदा उल्लेख करत त्यांनी हिंदी भाषा डायपर लावलेल्या लहान मुलांसारखी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
Kamal Haasan, Makkal Needhi Maiam in Chennai: Among the family of languages, the youngest is Hindi. It is a little child in diapers. We will have to take care of that language because it’s our child too. Compared to Tamil,Sanskrit, Telugu,it’s still the youngest language. (01.10) pic.twitter.com/bvv6rHdeSv
— ANI (@ANI) October 3, 2019
kamal-haasan-मक्कम निधी मय्यम चा एक कार्यक्रम चेन्नईत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांनी हिंदीविषयी वक्तव्य केले. हिंदी भाषा ही सगळ्या भाषांच्या कुटुंबातली सर्वात लहान वय असलेली भाषा आहे. डायपर लावलेले लहान मूल जसं असतं तसंच हिंदी भाषेचं स्वरुप आहे.
तमिळ, संस्कृत, तेलगु या भाषांशी हिंदी भाषेची तुलना केली तर मला हेच उदाहरण सुचतं. हिंदी भाषा ही लहान मुलासारखी आहे. अगदी डायपर लावलेल्या लहान मुलासारखी त्यामुळे या भाषेवर प्रेम करणं ती भाषा जपणं हे देखील आपलं काम आहे असं अभिनेते कमल हासन यांनी म्हटलं आहे.