दीपिका पादुकोण आपल्या इन्स्टाग्रामवरील अकौंटवर शालेय जीवनातील अनेक गोष्टींची-किश्श्यांच्या आठवणी शेअर करत असते. अलीकडेच तिने आपल्या शिक्षकांनी दिलेल्या शेऱ्याची आठवण सांगितली आहे. ती म्हणते की, मी खूप बडबडी होते. त्यामुळे शाळेत असताना शिक्षकांकडून सातत्याने त्याविषयी तक्रार केली जायची. दीपिकाला नियमांचे-सूचनांचे पालन करायला शिकवले पाहिजे, अशी शिक्षकांची तक्रार होती.
यावर दीपिकाचा पती रणवीर सिंहने लगेचच सहमती दर्शवली असून “हो मी शिक्षकांच्या मताशी सहमत आहे’ असे म्हटले आहे.
इतकेच नव्हे तर दीपिकाच्या शिक्षिका सांगतात की, तिला दिवसा स्वप्ने पाहण्याची सवय होती. ही पोस्ट दीपिकाने शेअर केल्यानंतर त्यावरही रणवीरने कमेंट केली आहे. तो म्हणतो, “असली दुनिया से दूर’ ! दीपिकाच्या या शाळेतील आठवणी, शिक्षिकांच्या प्रतिक्रिया आणि त्यावर रणवीरने केलेल्या मिश्किल टिप्पण्या या सध्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आहेत. रणवीरच्या कमेंटस् वाचल्यानंतर असे लक्षात येते की, दीपिका अजूनही शाळकरी जीवनात होती तशीच आहे!