मुंबई – आज देशात राष्ट्रपिता महात्मा गांधींजींची १५०वी जयंती साजरी करण्यात येत आहे. देशभरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी जयंतीनिमित्त भाजपचे सचिव आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर सलमान खानने ट्विट करून भारतीय तरुणांना संदेश दिला आहे.
#GandhiJayanti k is mauke pe, Bhai ne bola aapko message dene ko…
aur Chulbul Pandey is ready! @PMOIndia @KirenRijiju pic.twitter.com/qmL1WpflK2— Chulbul Pandey (@BeingSalmanKhan) October 1, 2019
दरम्यान, सलमानने त्याच्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतोय की ‘आज २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आहे. संपूर्ण देशात गांधी जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली जाते. कारण गांधीजी हे भारताचे राष्ट्रपिता होते आणि त्याच निमित्ताने सर्व तरुणांनी फिटनेस आणि स्वच्छतेवर थोडे लक्ष द्यावे. स्वच्छ भारत, स्वच्छ भारतीय आणि फिट इंडिया’ असा संदेश दिला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत सलमानने ‘गांधी जयंतीनिमित्त भाईने तुम्हाला संदेश द्यायला सांगितला आणि तो द्यायला चुलबुल पांडे तयार झाले आहेत ’ असे कॅप्शन देत त्याने शेअर केला आहे.
सध्या सलमान त्याच्या आगामी ‘दबंग ३’च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. ‘दबंग ३’ हा दबंग मालिकेतला तीसरा चित्रपट आहे. ‘दबंग ३’मध्ये मराठी सुपरस्टार आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ही देखील या चित्रपटामध्ये झळकणार आहे.