भूमी पेडणेकरने अचानक वातावरण बदलासाठी काम करायचे ठरवले आहे. “क्लायमेट वॉरिअर’ या नावाने एक उपक्रम सुरू केला आहे. पर्यावरणातील बदल आणि नैसर्गिक राहणीमानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना डिजीटल व्यासपीठावर एकत्र आणावे या हेतूने भूमीने हा उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमाद्वारे भूमी पर्यावरण प्रेमी संघटना आणि व्यक्तींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. याशिवाय पर्यावरणासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या कामाला प्रसिद्धीही दिली जाणार आहे.
आपल्या उपक्रमाची माहीती भूमीने इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये दिली आहे. शहरी ग्राहकांकडून पर्यावरणाचे सर्वाधिक शोषण होते, असा तिचा दावा आहे. दरम्यान भूमी आणि तापसीच्या “सांड की आंख’चे नवीन पोस्टर रिलीज झाले आहे.
या पोस्टरवर भूमीने एक प्रेरणादायी वाक्य लिहीले आहे. “हिम्मत करे इन्सान तो सहायता करे भगवान, बुढ्ढा हो या जवान बन जाता है महान’ असे तिने म्हटले आहे. “सांड की आंख’ मध्ये भूमी आणि तापसी दोघी वयाने ज्येष्ठ आणि हातात बंदुका घेतलेल्या दिसणार आहेत.