निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांशी संवाद
रेडा- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवार (दि.7) रात्री इंदापूर शहरातील सुमारे 35 गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन आरती केल्या. या भेटीदरम्यान हर्षवर्धन पाटील यांचे गणेशोत्सव मंडळांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केले. सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर पाटील हे राज्यामध्ये चर्चेत आहेत. त्यामुळे पाटील यांच्या गणेशोत्सव मंडळांना भेटीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
शहरातील शिवराज गणेशोत्सव मंडळाने स्वच्छतेचा संदेश देणारा उभारला आहे, मंडळाच्या या उपक्रमाचे पाटील यांनी भेटीदरम्यान कौतुक केले. श्रीगणेशाच्या आरतीनंतर मंडळांनी पाटील यांचा सत्कार केला. पाटील यांनी क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्यास जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहरातील गणेशोत्सव मंडळाच्या आरतीसाठी पाटील यांनी बुलेटवरून प्रवास केला. यावेळी शहरातील नगरसेवक,पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.