नवी दिल्ली – जम्मू काश्मीरसंबंधी असणारे कलम 370 केंद्र सरकारकडून हटवण्यात आल्यानंतर देशासह जगात याचे पडसाद उमटत असल्याचे दिसत आहेत. याचे पडसाद सोशल माध्यमांमध्ये सुद्धा दिसून येत आहे.
अशातच पाकिस्तानी ट्रोलर्सनी सोशल मीडियाद्वारे भारतीय कलाकारांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ट्विटरवर गायक-संगीतकार ‘अदनान सामी’ याला पाकिस्तानी ट्विटर युजर्सने काही खोचक प्रश्न विचारले होते. त्यावर अदनान सामीने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.
Sure…Kashmir is an integral part of India. Don’t poke your nose in things that do NOT belong to you! https://t.co/SPoTZPElka
— Adnan Sami (@AdnanSamiLive) August 15, 2019