नगर – स्कार्पिओतून पुण्याहून नगरकडे येणाऱ्या व्यक्तीला शस्त्राच्या धाक दाखवून मारहाण करून लुटल्याची घटना नगर-पुणे रस्त्यावरील केडगाव शहरात घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
राहुल भरतराव काळे (वय 28, रा. अंबड, घनसांगवी, जि. जालना) हे त्यांच्या मित्रांसमवेत स्कार्पियोतून (क्र. एम.एच 20, बी.जे 8610) नगरला येत होते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तिघांनी स्कार्पिओ अडवली. गुप्तीच्या धाकाने काळे व त्यांच्या मित्रांकडील 23 हजार 400 रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. तसेच काळे यांच्या मित्राला लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात राहुल काळे यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nice Information