तळेगावात विद्यार्थ्यांचा जीव धोक्‍यात

तळेगाव ढमढेरे – येथील वेळ नदीवरील भैरवनाथनगर बंधाऱ्यावरील संरक्षण कठडे तुटले असल्याबाबत ग्रामस्थांनी शिक्षण समितीने मागणी केली आहे, याची दखल आजपर्यंत घेतली नाही. तसेच त्याकडे संबंधित विभागाने कानाडोळा केला असल्याचे दिसत आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील पांढरीवस्ती जिल्हा प्राथमिक शाळेतील शिक्षण समिती आणि ग्रामस्थांकडून 24 ऑगस्ट रोजी अर्ज करून भैरवनाथनगर बंधाऱ्यावरील संरक्षण कठडे दुरुस्तीची मागणी केली होती. या मागणीला एक वर्ष होऊनही कोणत्याही प्रकारची हालचाल केली नाही. यंदा चांगल्याप्रकारे पाऊस झाल्याने सर्वत्र ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहे. परिसरातील शाळकरी मुले जीव मुठीत धरून याच पुलाचा जाण्या-येण्यासाठी वापर करीत आहे. या बंधाऱ्यांची दुरुस्ती होण्याची वाट पाहावी लागत असल्याचे ग्रामस्थ बोलत आहेत. या पुलावरून लहान शाळकरी मुलांना आणि ग्रामस्थांना जीव मुठीत धरून या पुलाचा वापर करावा लागत आहे.

येथे एखादी दुर्दैवी घटनेची वाट प्रशासन पाहत असल्याची तीव्र प्रतिक्रिया येथील नागरिक देत आहे. यावेळी सुदाम भुजबळ, वामन भुजबळ, लक्ष्मी भुजबळ, भुजबळ सोनाली भुजबळ, छाया भुजबळ, जयश्री भुजबळ, भुजबळ बंडोबा भुजबळ, विलास भुजबळ, जयंत भुजबळ, सुनील भुजबळ, मंदा भुजबळ यांनी बंधाऱ्यांची दुरुस्ती तात्काळ करण्याची मागणी केली आहे.

बंधारा दुरुस्ती करण्यासाठी पाईप आणलेले आहेत. पावसामुळे वेल्डिंग होत नसल्याने काम शिल्लक राहिले आहे. पाऊस उघडला की बनणाऱ्या वरील संरक्षण कठड्याचे काम पूर्ण करण्यात येईल.
-संजय खेडकर, ग्रामविकास अधिकारी तळेगाव ढमढेरे

Leave A Reply

Your email address will not be published.