मुंबई- बिग बॉस-2 मराठीमध्ये दर आठवड्याला काही ना काही नवीन घडताना पहायला मिळत आहे. त्यातच स्पर्धकांचे घरात ये-जा हे तर या सीझनचे खास वैशिष्ट्यच ठरले आहे. कारण काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा . चेक बाऊन्स प्रकरणी अटक करण्यात आलेले साताऱ्याचे ‘अभिजित बिचुकलेंचा’ यांचा पुन्हा प्रवेश झाला.
दरम्यान, बिग बॉसच्या या आठवड्यात अभिजीत केळकर, आरोह वेलणकर, शिव ठाकरे, किशोरी शहाणे हे सदस्य एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले आहेत. मागच्या एलिमिनेशनमध्ये रूपाली भोसले घराबाहेर पडली तेव्हा तिने विशेष अधिकाराने हिनाला एलिमिनेशनपासून सेफ केलं होतं.