पुणे – कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या शहीदांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी एफटीआयआयच्या प्रवेशद्वारावर “कारगिल वॉर मेमोरियल’ची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. लडाख येथील द्रास परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या “मेमोरियल’ची प्रतिकृती यंदा उभारण्यात आली आहे. एफटीआयआयच्या “आर्ट ऍन्ड प्रोडक्शन’ विभागातील विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून साकारलेली ही प्रतिकृती दि. 26 ऑगस्टपर्यंत पुणेकरांना पाहता येणार आहे.
26 जुलै 1999 रोजी भारताने पाकिस्तानवर कारगिल युद्धात विजय मिळविला होता. त्यामुळे दरवर्षी हा दिवस “कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. कारगिल विजय दिवसाला यावर्षी वीस वर्षे पूर्ण होत आहेत. यासह स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ही प्रतिकृती उभारण्यात आली.