मुंबई : भाजपच्या संघटनेते आता मोठा बदल होताना दिसत आहेत. त्यातच आता भाजपच्या संघटन महासचिवपदी मराठमोळ्या सतिश वेलणकर यांची निवड करण्यात आली आहे. रामलाल यांच्या जागी वेलणकर यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
रामलाल यांनी स्वत:हून आपल्याला या जबाबदारीतून मोकळे व्हायचे असल्याचे अमित शहा यांना सांगितले असल्याचे म्हटले जात आहे. तर आता यापुढे रामलाल हे संघाचे पुर्णवेळ काम पाहणार असून त्यांची राष्ट्रीय स्वंयसेवक संघात अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. रामलाल हे गेल्या 13 वर्षांपासून संघटन सचिवपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. दरम्यान, वयोमानामुळे आता नवीन माणसांनी ही जबाबदारी देण्यात यावी अशी विनंती त्यांनी अमित शहा यांना केली होती. त्यानुसार आता वेलणकर हे सध्या राष्ट्रीय संयुक्त महासचिवपदी काम पाहत आहेत.