नगर: सावेडी उपनगरात कचरा डेपो आणला. त्यास राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार वाकळे सुचक व संपत बारस्कर हे अनुमोदक आहेत. जमतेचा विरोध असतांना कचरा डेपो सावेडीत आणला असून डावा अंगलट आसल्यामुळे डेपो हटविण्यासाठी आंदोलन करत आहेत. राष्ट्रवादीचा हा प्रकार म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोप शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीवर केला आहे.
राष्ट्रवदीमुळेच सावेडी उपनगरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांनी महापालिकेत बहुमताने विषय मंजूर करून कचरा डेपो सावेडीत आणला. आता तेच कचरा डेपो स्थलांतरित करण्यासाठी आंदोलन करीत आहेत. या पाठीमागे काय गोडबंगाल आहे हे जनतेला समजले पाहिजे.