पुणे – जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी अद्याप मान्सूनचे आगमन झाले नसल्याने चिंता वाढली असली तरी मान्सूनची आतुरनेनं वाट पाहणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. कारण, पुढील 24 तासामध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे.
India Meteorological Dept: Monsoon is likely to set in over Kerala during next 24 hours. pic.twitter.com/rKi5gV9Iqa
— ANI (@ANI) June 7, 2019
तसेच पुढील 72 तासामध्ये नागालँड, छत्तीसगड, मिझोराम, त्रिपुरा, आसाम, मेघालय आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देखील भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच दिल्लीत 1 जुलै रोजी मान्सून दाखल होण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, सध्या देशात सर्वत्र उष्णतेची लाट आली आहे. त्यातच मान्सून सुद्धा अद्याप दाखल झाला नसल्याने उकाडा वाढला आहे. केरळात साधारण 1 जूनला मान्सून दाखल होतो. त्यानंतर 8 जूनपर्यंत तो महाराष्ट्रात दाखल होतो. पण, यंदा तो अद्याप केरळात दाखल झालेला नाही. यापूर्वी हवामान खात्याने तो 6 जूनदरम्यान दाखल होण्याचा अंदाज वर्तविला होता.