अॅसिड अटॅक पीडित ‘लक्ष्मी अग्रवाल’ यांच्या जीवनावर आधारित ‘छपाक’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच दीपिकाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबद माहिती दिली आहे. दीपिकाने चित्रपटाच्या संपूर्ण टीम सोबतचा आपला फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/ByS89rsACu8/?utm_source=ig_web_copy_link
छपाक चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. तर दीपिका पदुकोणही या चित्रपटाची निर्मिती करत आहे. दीपिकासह विक्रांत मेसीही चित्रपटात मुख्य भूमिका निभावत आहे. या चित्रपटात दीपिकाचे नाव मालती असणार आहे. ‘छपाक’ चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग मुख्यतः दिल्ली आणि मुंबईमध्ये झाले असून, 10 जानेवारी 2020 मध्ये चित्रपट रिलीज होणार आहे.
https://www.instagram.com/p/Bvao-MEAT56/?utm_source=ig_web_copy_link