नवी दिल्ली- पंतप्रधान म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी शपथ घेतली. त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात 57 सदस्यांना स्थान मिळाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. हा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर लगेचच दुसऱ्यादिवशी (शुक्रवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खात्यांचे वाटप केले. यावेळी राजनाथ सिंग यांना संरक्षण मंत्री हे खाते देण्यात आले आहे. दरम्यान, आज राजनाथ सिंग यांनी आपल्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे.
Assumed charge as the Raksha Mantri today. The MoD officials gave a presentation on the functioning of the Ministry.
I have instructed the officers to prepare detailed presentations on all Divisions and set time bound targets to achieve the desired outcome. pic.twitter.com/RXCIKvCS7v
— Rajnath Singh (मोदी का परिवार) (@rajnathsingh) June 1, 2019