निमसाखर- नेपाळ येथील 9 व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्यिनशिप 2019′ कराटे स्पर्धेमध्ये निमसाखर (ता. इंदापूर) येथील दोन विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. सायली सचिन चव्हाण व स्वराज सचिन चव्हाण या भांवडांनी कांस्यपदक पटकावले. नेपाळ येथील धनगडी भागात राष्ट्रीय खेल कुद परिषद, नेपाळ सरकारच्या माध्यमातून विविध क्रिडा स्पर्धांचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत 80 स्पर्धकांनी सहभाग घेतला. कराटे स्पर्धेत 26 ते 30 किलो वजनी गटात सायली चव्हाण हिने कांस्यपदक पटकावले. स्वराज चव्हाण याने 20 ते 25 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकाविले.
यावेळी कुस्ती, फुटबॉल, कबड्डी, क्रिकेटसह अन्य स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेसाठी नेपाळ, भारत, भूतान, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आदी 6 देशातील स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी उपराष्ट्रपती यांच्या हस्ते त्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या विद्यार्थ्यांना क्रिडा शिक्षक, पालक सचिन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. निमसाखर येथील एम. आर. इंग्रजी माध्यमच्या शाळेत सायली चव्हाण (इयत्ता 4 थी) व स्वराज सचिन चव्हाण इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत आहेत.