तळेगाव दाभाडे –वराळे (ता. मावळ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विशाल तुकाराम मराठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच मनिषा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक संपन्न झाली. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अभिषेक मराठे, निलेश मराठे, गणेश मराठे, सीमा मराठे, मनीषा मराठे, विकास पवार, प्रियंका भेगडे, अमृता मराठे, जनार्दन पारगे, प्राजक्ता, राजगुरु, नलीता वाजे, सारिका मांडेकर, अस्मिता मराठे, रुपाली आढाळे आदी उपस्थित होते.
उपसरपंचपदासाठी विशाल मराठे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. निवडणूक निर्णय अधिकारी आचार्य यांनी विशाल मराठे बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. ग्रामसेवक विनोद दुधाळ यांनी त्यांना सहाय्य केले. नवनिर्वाचित उपसरपंच विशाल मराठे म्हणाले, “”सर्वांना बरोबर घेऊन गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त वेळ देणार”.
विशाल मराठे यांच्या बिनविरोध निवडीसाठी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, माजी पंचायत समितीचे सभापती धोंडिबा मराठे, तळेगाव स्टेशन विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा माजी सरपंच ज्ञानेश्वर मराठे, माजी सरपंच मनोहर मराठे, विश्वनाथ मराठे, शंकरराव मराठे, तुकाराम मराठे, माजी उपसरपंच काळूराम मराठे, सचिन शेलार, बबनराव मराठे, गणपत मराठे, तळेगाव स्टेशन विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर मराठे यांनी प्रयत्न केले.