पिंपरी – पेट्रोलिंग व नाकाबंदी करीत असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या हवालदाराशी तिघांनी हुज्जत घालून त्यांच्या चारचाकी गाडीची काच फोडली. ही घटना निगडी येथील भेळ चौकात घडली. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत नेमणुकीस असलेले हवालदार शकुर मोहम्मद फकीर मोहम्मद तांबोळी (वय-41) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहुल प्रल्हाद पाटील (वय-25), शुभम प्रल्हाद पाटील (वय-27), अमित शांतिलाल पाटील (वय-26 सर्व रा. वाल्हेकरवाडी) यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील आरोपी हे ट्रीपलसीट प्रवास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.