सुपरहिट “जुडवा’ चित्रपटाचा रीमेक बनविल्यानंतर डायरेक्टर डेविड धवन आपल्या आणखी एका सुपरहिट चित्रपट असलेल्या “कुली नंबर 1’चा रीमेक साकारत आहेत. गोविंदा आणि करिश्मा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात वरुण धवन आणि सारा अली खान हे लीड रोल साकारत आहे. आता या चित्रपटासाठी परेश रावल यांनाही कास्ट करण्यात आले असल्याचे समजते.
“कुली नंबर 1’मध्ये परेश रावल हे कादर खानच्या भूमिकेत झळकणार आहेत. कादर खान यांनी करिश्मा कपूरच्या वडीलांची भूमिका साकारली होती. यापूर्वी मुख्य भूमिका साकारणा-या वरुण धवन यानेही या चित्रपटाबाबत उत्सुकता दर्शविली होती.
वरुणने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला होता. यात “कुली नंबर 1’चा बॅच दाखविण्यात आला होता. तसेच हा चित्रपट 1 मे 2020मध्ये प्रदर्शित होईल, असेही सुतोवाच केले होते. दरम्यान, वरुणचा नुकताच प्रदर्शित झालेला “कलंक’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता तो रेमो डिसूजाच्या आगामी “स्ट्रीट डान्सर’मध्ये श्रद्धा कपूरसोबत पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.