लाहोर – पाकिस्तानात लाहोर येथील एका सुफी प्रार्थनास्थळाजवळ रमजान महिन्याच्या सुरवातीलाच झालेल्या एका आत्मघाती स्फोटात नऊ जण ठार झाले. सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमाराला दाता दरबार प्रार्थनास्थळाच्या गेटनंबर 2 जवळ हा स्फोट झाला. सुफी पंथीयांचे हे पाकिस्तानातील व दक्षिण अशियातील सर्वात मोठे प्रार्थनास्थळ आहे. त्या ठिकाणी पोलिस व सुरक्षा व्यवस्था पुर्ण तैनात असताना हा प्रकार घडला. या स्फोटात अन्य 25 जण ठार झाले आहेत. जखमींमध्ये काही पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश असून त्यातील चार कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की या प्रार्थनास्ळा जवळ इलाईट फोर्सची जी वाहने तैनात होती त्याला लक्ष्य करण्यासाठी हा स्फोट घडवण्यात आला. तो आत्मघाती स्वरूपाचा होता. स्वता भोवती स्फोटके गुंडाळलेला एक इसम पोलिसांच्या वाहनाजवळ आला आणि त्याने स्वताला उडवून दिले.
जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याचा धोका आहे असे पंजाबचे कायदा मंत्री भारत राजा यांनी सांगितले. ठार झालेल्यांमध्ये एक पोलिस कर्मचारीही असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेचा निषेध केला आहे. याच प्रार्थना स्थळावर सन 2010 सालीही हल्ला झाला होता. त्यात चाळीस जण ठार झाले होते.