नगर: शहरातील प्रेमदान चौकातील तोरणा हॉटेलवर भरदिवसा ऍसिड फेकल्या प्रकरणी एका युवतीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. प्रियकराला धडा शिकवण्यासाठी तीनेच ऍसिड फेकले असल्याचे तपासात समोर आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी (दि.6) रोजी दुपारी साडे अकराच्या दरम्यान प्रेमदान चौकातील तोरणा हॉटेल येथे अमीर रशीद शेख (वय-25, रा. केरुळ, ता आष्टी, जि बीड) हा व त्याचा मित्र अजरुद्दीन शेख याचेसोबत बसलेला असता एका अनोळखी व्यक्तीने अचानक येवून त्या दोघाच्या अंगावर ऍसिड फेकले. त्यामध्ये शेख हे जखमी झाले.
याप्रकरणी पोलिसांनी एका तरूणीस चौकशी साठी ताब्यात घेतले होते. तिच्याकडे चौकशी केली असता तिने प्रियकराला धडा शिकण्यासाठी आपन ऍसिड फेकल्याचे सांगितले. अधिक माहिती घेतले असता फिर्यादी अमीर रशीद शेख याचे आरोपी (रा.नगर) हिचेशी 2 वर्षापासून प्रेमसंबंध होते. परंतु फिर्यादी अमीर शेख हा तीचे व्यतीरीक्त इतर मुलींशी मैत्री करत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्याचा राग मनात ठेवून अमीरला धडा शिकविण्यासाठी डिसेंबर 2018 सालापासुन तयारी सुरू केली होती. सोमवारी (दि.6 रोजी) फिर्यादी अमीर शेख यास हॉटेल तोरणा येथे बोलावीले व त्यास हॉटेलचे आत बसण्यास सांगितले. अमीर व त्याचा मित्र अजरुद्दीन याचेसोबत आरोपीची वाट पहात बसला होता. त्यावेळी आरोपीने अचानक येवुन अमीर शेख याचे तोंडावर ऍसिड फेकले. क्राईम पेट्रोल मालीका पाहून ऍसीड फेकण्याची आयडीया घेतल्याचे सांगितले आहे.
पोलीस अधीक्षक इशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एच.पी. मुलाणी यांच्यापथकाने सोळंके, मेढे, नंदकुमार सांगळे, दत्तात्रय जपे, मंगेश खरमाळे यांच्या पथकाने तपास केला.