नवी दिल्ली – विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना भारतीय संघातील चौथ्यास्थानावरील खेळाडूची निवड अद्याप झालेली नसून भारताचे माजी खेळाडू क्रिष्णमाचारी श्रीकांत यांच्यामते चौथ्या क्रमांकासाठी महेंद्रसिंग धोनी हा एक उत्तम पर्याय असून त्याला या स्थानावर खेळवले जावे असेही त्यांनी म्हटले आहे.
या विषयी बोलताना ते म्हणाले की, चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजीसाठी येणार यावर चर्चा होते आहे. मात्र, माझ्या मते, धोनी हा चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.